शासकीय नोकरीत सेवाभावाने कार्य करणे ही एक समाजसेवा -कार्यकारी अभियंता नान्नोर


शासकीय नोकरीत सेवाभावाने कार्य करणे ही एक समाजसेवा -कार्यकारी अभियंता नान्नोर

 अहमदनगर पाटबंधारे विभागाचे भगवान नागले सेवानिवृत्त

 नागले यांचा सपत्निक सत्कार करुन निरोप

 अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) शासकीय नोकरीत सेवाभावाने कार्य करणे ही एक समाजसेवा असून, सरकारी नोकरी लोकसेवेचे माध्यम आहे. लक्ष्मण नागले यांनी नोकरीकडे एक सेवाभावाने पाहून कर्तव्यनिष्ठेने कार्य केले. निष्कलंक व निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा नेहमीच स्मरणात राहणार असल्याची भावना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी व्यक्त केली. 

अहमदनगर पाटबंधारे विभागाचे भगवान नागले सेवानिवृत्त झाले असता त्यांच्या सेवापुर्तीचा कार्यक्रम कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी कार्यकारी अभियंता नान्नोर बोलत होते. यावेळी नाशिक येथील कार्यकारी अभियंता किरण देशमुख, निवृत्त कार्यकारी अभियंता जयकुमार संचेती, आशाताई नागले, उपकार्यकारी अभियंता सुनिल जगताप, विकास शिंदे, गौरव कुमार आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रमोद भांड यांनी भगवान नागले यांनी पाटबंधारे विभागात नाईक पदाची 33 वर्ष जबाबदारी सांभाळताना केलेल्या कार्याची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत भगवान नागले यांनी केले. कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी निस्वार्थ भावनेने कार्य करणारा कर्मचारी कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण नागले आहेत. त्यांनी कोणत्याही कामास कमीपणा न मानता दिलेले काम प्रामाणिकपणे पुर्ण केले. कोणतेही काम छोटे अथवा मोठे नसते ते काम तुम्ही कोणत्या भावनेने करता याला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. 

सत्काराला उत्तर देताना भगवान नागले म्हणाले की, कामे करत असताना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागला. दिलेल्या काम हे ईश्‍वर पूजा मानून प्रमाणिकपणे केले. टाळेबंदीतही यामध्ये कधी खंड पडू दिला नाही. निष्ठेने केलेल्या कार्याने यश प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, रतन तुपविहीरे व अनिल जाधव यांनी नागले यांचा सत्कार केला. तसेच विविध संस्था, स्वयंसेवी संघटना, नागले परिवार व मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोपट देवकर, कृष्णाजी मिसाळ, दत्तात्रय देवकर, अरविंद साळुंके आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले. आभार योगेश नागले यांनी मानले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News