कोरोना कालाचा गैरफायदा घेऊन केंद्र सरकार ने तयार केलेले काले कृषी कायदे मागे घयावे अँड शुभाष लांडे


कोरोना कालाचा गैरफायदा घेऊन केंद्र सरकार ने तयार केलेले काले कृषी कायदे मागे घयावे अँड शुभाष लांडे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

आखतवाडे ( ता. शेवगाव ) येथे किसान संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलताना भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे. समवेत संजय नांगरे, दिगंबर उगले, बापूराव राशिनकर आदी.

कोरोना काळाचा गैरफायदा घेऊन केंद्राने तयार केलेले तीन काळे कृषी कायदे व  वाढीव वीजबील कायदा 2020 मागे घ्यावा यासाठी किसान संघर्ष समन्वय समितीने राज्यभर किसान संघर्ष यात्रा काढत शेतक-यांत जनजागृती केली जात आहे. शेतक-यांनी आता दिल्लीतील शेतकरी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे केले आहे.

आखतवाडे ( ता. शेवगाव ) येथे किसान संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी कॉम्रेड नामदेव गावडे लिखीत शेतकरी विरोधी तीन काळे कायदे व साप्ताहिक युगांतरचा शेतकरी आंदोलन विशेष अंक व पत्रके वितरीत करण्यात आले.

  अॅड. लांडे म्हणाले, नवी दिल्लीत २७ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने किसान संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. सर्व शेतक-यांचा व शेतकरी संघटनेचा विरोध असताना कोरोना काळाचा गैरफायदा घेऊन केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे तयार केले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शेतक-यांनी या कायद्याला विरोध दर्शविला आहे. मात्र मोदी सरकारच्या वतीने हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगण्यात येत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. दिल्लीत जमा झालेले आंदोलक सहा महिन्यांचा शिधा घेऊन सर्व शेतक-यांच्या भल्यासाठी लढत आहेत. केंद्र सरकारने कृषी कायद्यांचे समर्थन केले वा शेतकरी आंदोलनाबाबत खोटा प्रचार करून फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी देशातील एकजूट झालेल्या सर्व शेतकरी संघटना तीन कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबविणार नाहीत.

या वेळी किसानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, भाकपचे तालुका सचिव संजय नांगरे आदींची भाषणे झाली. या वेळी विठ्ठलराव उगले, भारत उगले, संजय साळवे, सतीश उगले, दिगंबर पाटील उगले, शेषेराव उगले, नारायण उगले, हरिभाऊ उगले, ज्ञानेश्वर राशिनकर आदींसह  शेतकरी उपस्थित होते.
 .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News