पळशीच्या उपसरपंचपदी हौसाबाई गडदरे यांची निवड


पळशीच्या उपसरपंचपदी हौसाबाई गडदरे यांची निवड

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

पळशी (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हौसाबाई हिरामण गडदरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. संदिप कोळेकर यांनी ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा दिला होता त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 

पळशी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच बाबासाहेब चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.२२ डिसेंबर रोजी निवडणुक घेण्यात आली. यावेळी हौसाबाई गडदरे  यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आल्याचे सरपंच बाबासाहेब चोरमले यांनी घोषित केले.

     यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदिप कोळेकर, शालन कोळेकर, संगीता गुलदगड, ललिता हाके, लक्ष्मण कोळेकर, गणपत चोरमले, बाबासो सोनवलकर, शंकर भापकर, भाऊसाहेब गुलदगड, शिवराज माने, दादासो करे, संपत गडदरे, ग्रामसेविका दिपाली हिरवे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News