रवंदे -टाकळी रस्त्याचे काम उत्कृष्ट करा अन्यथा काम बंद पाडु !! बाळासाहेब आहिरे


रवंदे -टाकळी रस्त्याचे काम उत्कृष्ट करा अन्यथा काम बंद पाडु !! बाळासाहेब आहिरे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी   रवंदे - टाकळी रस्त्याचे काम उत्कृष्ट पध्दतीचे करा.अन्यथा सदर रस्त्याचे काम बंद पाडू, असा इशारा भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती आघाडीचे कोपरगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब आहिरे यांनी दिला आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये रस्त्यांच्या कामासाठी मोठया प्रमाणात निधी आणून मतदार संघातील दळणवळणाचा प्रश्न  माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी

प्राधान्याने मार्गी लावला. या माध्यमातून अर्थसंकल्प सन 2019-20 अंतर्गत रवंदे-टाकळी-धोत्रे-घोयेगाव भवुर प्रजिमा 5 मधील 1.रवंदे ते टाकळी, 5 कि.मी. व 2. धोत्रे ते भवूर औरंगाबाद जिल्हा हदद 3.300 कि.मी. असे एकुण 8.300 कि.मी. अंतरासाठी सुमारे 3 कोटी 32 लाख रूपयाचा निधी मंजुर केला. सौ कोल्हे यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु सदरचे काम निकृष्ट होत असल्याच्या नागरीकांनी मोठया प्रमाणात तक्रारी केलेल्या आहे. वास्तविक सौ स्नेहलता कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मतदार संघामध्ये मोठया प्रमाणात निधी आणून विविध विकासकामे केली. कामांचा प्रचंड डोंगर उभा केलेला आहे, आजही त्यांच्याच कार्यकाळात मंजुर झालेल्या निधीतील कामे सुरू असुन रवंदे-टाकळी या रस्त्याचे काम त्यांच्याच कार्यकाळातील काम आहे. पंरतु सदरचे काम अतिशय निकृष्ट होत असल्याच्या मोठया प्रमाणात तक्रारी आलेल्या आहे, सदरच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता टिकवावी अन्यथा काम निकृष्ट होत असेल तर आम्ही सदरचे काम बंद पाडू असा इशारा बाळासाहेब आहिरे यांनी दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News