वरुर येथे कोरोना योद्धा व भारतीय सेनेत निवड झालेल्या भूमिपुत्रांचा सन्मान


वरुर येथे कोरोना  योद्धा व भारतीय सेनेत  निवड झालेल्या भूमिपुत्रांचा सन्मान

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

श्रीक्षेत्र वरूर बुद्रुक येथे कोरोना संकट काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कोरोना  योद्धा म्हणून कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला.त्याच बरोबर भारतीय सैन्यामध्ये भरती झालेल्या तरुणांचा सत्कार समारंभ सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पावरा,माजी प्राचार्य दिलीप फलके,प्रा.किसन माने,माजी सरपंच विष्णू पा.म्हस्के,मेजर अन्वर शेख यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.वरुर येथे अभिनव फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी, म्हणून आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत कार्तिकी म्हस्के,तुषार शिंदे,गीता म्हस्के यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाल्याबद्दल चि.शुभम पाचरणे,कृष्णा देशमुख या  गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.भारतीय लष्कर सेनेमध्ये निवड झालेले गावातील युवक योगेश म्हस्के,सचिन गावडे , महेश दळे,अमोल केदार,सोमनाथ लाड,नितीन मिसाळ यांना गौरविण्यात आले. डॉ.राजेंद्र कोठुळे,डॉ.गजेंद्र खांबट,डॉ.सूर्यकांत पिसे,सुनिता चव्हाण,ज्योती तुजारे,मिनाताई उभेदळ ,सुनील काकडे,निलेश मोरे सर यांचा कोरोना काळातील विशेष सेवेबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीस पात्र मुलांची लक्षवेधी भाषणे झाली .

प्रास्ताविक सचिन म्हस्के सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर भाऊसाहेब पाचरणे यांनी आभार मानले यावेळी सरपंच वैभव पुरनाळे,रविराज फलके,श्रीकांत मुरदारे,संदीप दरवडे,राजेंद्र नागरगोजे,गोपाळ खांबट,मनोहर कर्डिले,अक्षय डांगरे,आबासाहेब बेडके सर,आत्माराम म्हस्के,प्रविण म्हस्के,ज्ञानेश्वर म्हस्के,एकनाथ म्हस्के,हमीद शेख,रवि मोरे,गणेश मोरे,महेश म्हस्के,अभिषेक खडके,किरण म्हस्के,विकास म्हस्के,स्वानंद पालवे,अविनाश म्हस्के आदीसह ग्रामस्थ मोठ्या सखेने  उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News