महाराष्ट्र लघु वुत्त पत्र व पत्रकार संघाच्या 2021च्या स्नेह मेळाव्याच्या नि योजनार्थ बैठक संपन्न


महाराष्ट्र लघु वुत्त पत्र व पत्रकार संघाच्या 2021च्या स्नेह मेळाव्याच्या नि योजनार्थ बैठक संपन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्यावतीने जानेवारी 2021 मध्ये आयोजित कै. वसंतराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ पत्रकार संघाचे श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात रविवार दिनांक 20- 12-2020 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय मिडीया फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र वाघ हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी केले.

      यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जहागीरदार, उपाध्यक्ष बी.के.सौदागर, महासचिव शेख फकीर मोहम्मद, शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जाद भाई पठाण, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड, पत्रकार संघाचे कायदेविषयक सल्लागार अँड.हाजी मसूरभाई जहागीरदार, प्रदेश महासचिव फकीर महंमद शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मंन्सूरभाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाबखान,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

   प्रास्ताविक राजमोहंमद शेख यांनी केले या बैठकीत स्नेहमेळावा कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली याच बरोबर कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम पार पाडणे करीता कार्यक्रम समितीची निवड करण्यात आली. या समितीवर अब्दुल्ला भाई चौधरी,अमीरभाई जागीरदार, मन्सूरभाई पठाण, रियाज खान, अस्लम बिनसाद, वहाब खान, विजय खरात,सज्जादभाई पठाण, राजमोहंमद शेख,

 मिलिंद शेंडगे,

आदींची निवड करण्यात आली आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतीय मिडीया फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी भारतीय मीडिया फाउंडेशन इतर पत्रकार संघांना बरोबर घेऊन काम करण्याची दानत ठेवून लघु वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांच्या अडचणी सोडविणे करिता प्रयत्नशील आहे पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा बिंदुसार जी यांनी पत्रकारांना किमान वेतन द्यावे त्यांच्या विमा पॉलिसी बद्दल हमी घ्यावी पत्रकारांच्या मुला-मुलींना शैक्षणिक सवलती द्याव्यात पत्रकारांना निवास्थान देण्यात यावी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना त्यांना पुढील आयुष्य साधारणपणे जगता येईल अशी भरीव मदत द्यावी पत्रकार संरक्षण कायद्यात किमान तीन वर्षे पत्रकारिता केलेल्या पत्रकारांना समाविष्ट करून घेण्यात यावे अशाप्रकारे पत्रकारांच्या विकासाबद्दलचा विचार करता अनेक मागण्या केंद्र शासनाकडे केलेल्या आहेत. या मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावे याकरिता मीडिया फाउंडेशन च्या वतीने दिल्ली येथील रामलीला मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख बरकत अली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकाराला जात नसते जनसेवा करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करणे हीच खरी पत्रकारिता ठरते सध्या पत्रकारितेला व पत्रकार संघांना जातीय स्वरूप दिले जात आहे आशा पत्रकार संघापासून पत्रकारांनी दूर रहावे व देशातील एकात्मता जोपासावी आपण याच उद्देशाने गेली पस्तीस वर्ष लघु वृत्तपत्रांच्या पत्रकारांना सोबत घेऊन लिखाणाच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्याचे व त्यांच्यावरील अत्याचार दूर करण्याचे कार्य करीत आहे. पत्रकार बांधवांवर झालेल्या अत्याचारास पत्रकार संघाकडून

 त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही केलेला आहे. ज्यावेळेस पत्रकारांवर व त्यांच्या लेखणीवर गदा आणण्याच्या दुष्ट हेतूने पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले अशा वेळेस आम्ही पत्रकार संघाच्या वतीने त्या पत्रकारांना त्या खोट्या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. हा पत्रकार संघ सर्वसामान्य जनता व पत्रकारांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. बैठकीस प्रा. त्रिभूवन सर,

दस्तगिर शाह, गरीबी निर्मुलन समितीच्या शबाना भाबी, मोहंमद इलियास,साजिद शाह,गुलाब भाई वायरमन, अरुण बागूल, अक्रम कुरेशी, शब्बीर कुरेशी, प्रतापसिंग  राठोड, मुअज्जम शेख,जिशान काझी,सलीम गोसावी,अफजल खान,अकबर भाई शेख, सुभाषराव गायकवाड, मोहन जाधव, संजय शेलार, रमेश शिरसाठ,अमोल शिरसाठ,आदी पत्रकार उपस्थित होते. फकीर मोहंमद शेख यांनी शेवटी आभार शेवटी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News