कोपरगावात पाणी पेटले !!वंचित बहुजन आघाडीचा येत्या २८तारखेला आंदोलनाचा इशारा !


कोपरगावात पाणी पेटले !!वंचित बहुजन आघाडीचा येत्या २८तारखेला आंदोलनाचा इशारा !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी .

कोपरगाव नगरपरिषद कोपरगावातील नागरिकांकडुन पाणीपट्टी वर्षाची आकारत असते.परंतु पाणी मात्र कधी चार दिवसाआड,कधी आठ दिवसाआड,तर कधी पंधरादिवसांनी देते

दुष्काळ असो,पावसाळा असो उन्हाळा पाणी मात्र चार,आठ, दिवसाआड दिले जाते.त्यामुळे जेवढे पाणी दिले जाते तेवढीच पाणी पट्टी आकारावी.तसेच कोपरगाव शहराला पाणीपुरवणारी

 तळे पूर्ण भरलेली असतांना वर्तमान परीस्थितीत कोपरगावकरांना पाणी सहा दिवसाआड का दिले जाते,असा सवाल वंचित बहुजनआघाडीच्या वतिने नगर परीषद प्रशासनाला विचाराला जात आहे. कोपरगावकरांना दररोज अथवा दिवसाआड पाणी पुरवठा करावा अन्यथा २८ /१२/२०२० रोजी दिवसभर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करु अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांतजी सरोदे यांना देण्यात आले आहे .

   यावेळी मा.जिल्हाध्यक्ष व जिल्हा सल्लागार शरद खरात, शहर अध्यक्ष राजू जाधव शहर महासचिव रवींद्र भालेराव, तालुका अध्यक्ष रणजित खरात, तालुका महासचिव रवींद्र अहिरे, ऑल इंडिया पँथर सेना तालुका अध्यक्ष प्रभाकर थोरात,  बाळासाहेब खाजेकर,  विश्वास जमधडे,गौतम पगारे, मा.तालुका संघटक सुरेश सोंपासरे, आनंद कोपरे, सागर साठे, पप्पू धामणे, सचिन त्रिभुवन, सोनू मरसाळे, कुमार लोंढे, संजय भुजबळ, सुनील वाहुलकर, राहुल धिवर,विकी आव्हाड ,बापू वाघमारे उपस्थित होते.

मुंबई,पुणे व इतर नगरपालीकांच्या करा पेक्षा कोपरगाव करांचे पाणीपट्टी जास्त आहे.कोपरगावातुन गोदावरी नदी वाहत असुन कोपरगाव नगरपरिषदेने जागा घेवुन तेथे तळे बांधून गोदावरी तुन पाणी उचलल्यास कोपरगावकरांचा पाणी प्रश्न कायमचा मिटु शकतो.

असे वंचित बहुजन आघाडीचे मा.जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी यावेळी सांगीतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News