भारताचा सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जि ना देण्याबाबत विश्व इंडियन पार्टी vip चे पहिले मिशन अण्णाभाऊंच्या जन्मस्थळी वाटेगाव येथे पूर्ण झाले.


भारताचा सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जि ना देण्याबाबत विश्व इंडियन पार्टी vip चे पहिले मिशन अण्णाभाऊंच्या जन्मस्थळी वाटेगाव येथे पूर्ण झाले.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

आज दिनांक 20 डिसेंबर 2020 रविवार रोजी इस्लामपूर जिल्हा सांगली इस्लामपूर पत्रकार भवनात विश्व इंडियन पार्टी vip पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी च्या वतीने vip पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक सुभाष जी वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी प्राध्यापक सुभाष वायदंडे पत्रकारांसमोर बोलताना बोलत होते की साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देण्याबाबत विश्व इंडियन पार्टी vip ने विडा उचललेला आहे त्यासाठी पार्टीने पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा अध्यक्षांना उदाहरणार्थ पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्‍यांना साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत निवेदन देऊन प्रशासनाला दखल घ्यावी लागत आहे या निवेदनाच्या पार्श्वभूमी पाठीमागे राज्याचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री देशाचे राष्ट्रपती आणि विश्व इंडियन पार्टी व्हीआयपी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना ई-मेल द्वारे या सर्व जण आंदोलनाची माहिती पोहोचवली जात आहे पार्टीचे दुसरे मिशन महाराष्ट्रातील सर्व विभागांना पश्चिम महाराष्ट्राच्या पॅटर्ननुसार मिशन राबून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निवेदन देऊन पूर्ण करणार नंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांची शिफारस घेऊन महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई प्रदेश उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या विभागांमध्ये पक्षाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत विभागानुसार रास्ता रोको आंदोलन करून चौथे मिशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पदाधिकारी रास्ता रोको आंदोलन करतील नंतर vip पक्ष च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना डेपोटेशन घेऊन निवेदन देणार नंतर उपमुख्यमंत्री राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार राज्याचे विरोधी पक्ष नेता यांना पण निवेदन देणार व सर्व राजकीय स्वपक्षीय पक्ष संस्थापक त्यानंतर  त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची संमती घेऊन त्यांची शिफारस घेऊन नंतर मिशन दिल्ली येथे जंतर-मंतरवर तीन दिवस साखळी उपोषण करून देशाचे प्रधानमंत्री यांना निवेदन सादर करणार त्यानंतर महामहिम राष्ट्रपति जी यांना निवेदन सादर करणे अशा पद्धतीने साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत विश्व इंडियन पार्टी vip चे जन आंदोलन सुरू राहणार कारण साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देणे हा भारतीयांचा अस्मितेचा प्रश्न आहे असे पत्रकारांना पत्रकारांशी बोलत होते व पक्षा चे ध्येयधोरणे व उद्देश बद्दल माहिती दिली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वायदंडे म्हणाले पक्ष 2016 ला दिल्ली लाल किल्ल्यावर राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या विचारविनिमय करून स्थापन झाला आहे. पक्षाने नगरपालिका महानगरपालिका मालेगाव जिल्हा नाशिक व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे येथे निवडणुका लढवल्या आहेत व वर्तमानात आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला विश्व इंडियन पार्टी सामोरे जाणार असे पत्रकारां समोर विश्व इंडियन पार्टी व्हीआय पी चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे बोलत होते पत्रकार परिषदेचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने केले होते विश्व इंडियन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष भाई अविचांदणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे कोर कमिटी च्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील इस्लामपूर येथील सामाजिक राजकीय नेते प्राध्यापक सुभाष वायदंडे यांची विश्व इंडियन पार्टी VIP च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहिदास जी जगताप यांच्या हस्ते करण्यात आला पत्रकार परिषदेचा सांगता समारंभ होऊन इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजां च्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर इस्लामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून वाटेगाव येथे साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थळी जाऊन अण्णाभाऊंच्या नातवाला माननीय सचिन शंकर साठे यांच्याशी चर्चा विनिमय करून भारतरत्न पुरस्कार देण्याबाबतचे मिशनची कल्पना देण्यात आली व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देऊन पहिले मिशन पूर्ण करण्यात आले याप्रसंगी विश्व इंडियन पार्टी vip चे मान्यवर पदाधिकारी नेते प्राध्यापक सुभाष जी वायदंडे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष vip पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष vip माननीय रोहिदास जी जगताप .पश्चिम महाराष्ट्र प्रदेश महासचिव अंबादास इनामदार पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक रमेश कुचेकर पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नितीन तुपे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश महासचिव महिला आघाडी लताताई घोरपडे सांगली जिल्हा हा अध्यक्ष महिला आघाडी छायाताई मोरे व पुणे जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ कुचेकर सातारा जिल्हा अध्यक्ष मारुती बोभाटे सांगली जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत लोंढे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विनोद लोंढे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष सुजित मोरे वाळवा तालुका अध्यक्ष संतोष साठे कोरेगाव तालुका अध्यक्ष निखिल माने सातारा सामाजिक कार्यकर्ते अवघडे हार्दिक इनामदार राजवर्धन सुभाष वायदंडे इस्लामपूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते शेवटी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश महासचिव vip अंबादास इनामदार यांनी आभार मानले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News