प्रथा इंडिया न्यूज चैनल तसेच स्टार टीव्ही नाईन चे संपादक सुनील ज्ञानदेव भोसले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल अवार्ड जाहीर


प्रथा इंडिया न्यूज चैनल तसेच स्टार टीव्ही नाईन चे संपादक  सुनील ज्ञानदेव भोसले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल अवार्ड जाहीर

शिर्डी राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी.                                           प्रथा इंडिया न्यूज चैनल तसेच स्टार टीव्ही नाईन चे संपादक अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता मंडळ उपाध्यक्ष महा.राज्य व दैनिक मराठवाडा केसरी व हिंद सम्राट चे पत्रकार सुनील ज्ञानदेव भोसले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल अवार्ड जाहीर पारधी समाजात घडविला आदर्शाचा नवा इतिहास                             पुणे जिल्हा उरली कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे याठिकाणी जन्मलेला हिरा सुनील भाऊ भोसले यांना या वर्षीचा सर्वोत्कृष्ट भारत सेवा रत्न गोल्ड मेडल हा पुरस्कार जाहीर झाला असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुनील भाऊ यांनी गावाला महाराष्ट्राला आणि देशाला फार मोठा सन्मान प्राप्त करून दिला पारधी समाजात जन्माला आलेल्या युवक हालाखीचे जीवन त्यावर मात करून जिद्द व चिकाटीने स्वकर्तुत्वाने जीवनाची दिशा बदलून टाकली पारधी समाज म्हटला की लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो मात्र या कुटुंबाने ती व्याख्या मोडीत काढून महाराष्ट्राला दिशादर्शक मार्ग दाखविला आहे त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केले असून भविष्यात सुनील भाऊ चे कार्य एक तरुण वर्गासाठी पारधी समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या माणसाने अहोरात्र कष्ट करून यश शिखर गाठले 

एका म्हणीप्रमाणे, स्वप्न ती नाहीत जी झोपेत पडतात स्वप्न त्यांना म्हणतात जी झोप उडवतात या स्वप्नांना पंख देण्यासाठी या तरुणांनी ध्येय वेडे होऊन अनेकांना मार्गदर्शन करून समाजात राज्यात खूप माणसे घडवली आहे

खरंच समाधान असेल त्यांचे माउलीच्या चेहऱ्यावर की त्यांच्या पोटी असा हिरा जन्माला आला भविष्यात महाराष्ट्रामध्ये एक नाव एक नवा पर्व एक सूर्य उदयला आल्याशिवाय राहणार नाही तरुण वर्गासाठी एक आदर्श वक्ता आदर्श व्यक्तिमत्व आदर्श पत्रकार यासर्व पात्रतेचा देव माणूस तरुणांनी या माणसाकडून संधीच सोनं करून घ्यावे पुन्हा सुनील भाऊ यांना औरंगाबाद पत्रकार,अहमदनगर पत्रकार , तसेच मराठवाडा विभाग यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News