संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद व्हाव्यायासाठी आपल्या किर्तनातुन समाजप्रबोधन करणारे श्री संत गाडगेबाब हेच खरे समाजसुधारक असुन तत्कालीन समाज सुधारकांमध्ये गाडगेबाबांचे नाव अग्रक्रमाने येते असे गोकुळचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी म्हटले आहे .
संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत छोटेखानी कार्यक्रमात प्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक एस.डी.गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.अनिल अमृतकर केले.
या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,लकारे आर.आर,शिरसाळे एस.एन,कोताडे ए.जे,व्ही.एम.आव्हाड,गोसावी के.एस,सौ.महानुभाव के.एच,बोरावके आर.आर,गायकवाड ए.जी,रायते यु.एस,वाडीले एस.एस,तुपकर आर.एस आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले आहे.