श्री नायकोबा देवाची यात्रा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरी


श्री नायकोबा देवाची यात्रा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) 

बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री नायकोबा देवाची यात्रा कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. 

     श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्या वतीने सर्व भाविकांना दि. १५ व १६ डिसेंबर २०२० रोजी होणारी यावर्षीची श्री नायकोबा देवस्थान यात्रा व पालखी सोहळा कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीमुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे नायकोबा मंदिर परिसरात भाविकांनी यात्रेच्या दरम्यान गर्दी करू नये असे आवाहनही नायकोबा देवस्थान यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले होते. त्यास भाविकांनी सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.

   श्री नायकोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून राज्याच्या विविध भागातून भाविक दरवर्षी याठिकाणी येत असतात.

     मंगळवारी १५ तारखेला रात्री देवाचा छबिना व बुधवारी (दि.१६) पहाटे आरती साध्या पद्धतीने, कोरोनाचे नियम पाळून मोजक्याच भक्तांच्यात घेण्यात आली. यंदा कोरोनामुळे बाकी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. 

   श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी, विकासआण्णा बारवकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक पार पडली होती त्यात यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

  यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष भाऊसो टकले, डॉ.अविनाश बारवकर, आबा टकले, उमाजी टकले, गुंडा टकले, भाऊसाहेब कांबळे, खंडू कोळेकर, खंडू टकले, दत्तोबा टकले, बापू टकले, सिधा टकले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News