राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा एकतिसावा पुण्यतिथी सोहळा रद्द दर्शन मात्र सुरू राहणार !! मोहनराव चव्हाण


राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा एकतिसावा पुण्यतिथी सोहळा रद्द दर्शन मात्र सुरू राहणार !! मोहनराव चव्हाण

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.  

                       कोपरगाव_आगामी २७ डिसेंबर रोजी कोपरगाव बेटातील आश्रमात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचा साजरा होणारा एकतिसावा पुण्यतिथी सोहळा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.

 मात्र भाविक,भक्तगण यांना जनार्दन स्वामी समाधीचे दर्शन सोशल डिस्टंसिंग पाळून दिले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष मोहनराव चव्हाण व सर्व विश्वस्तांनी पत्रकारांना दिली आहे.

 पुढे ते म्हणाले कि यावर्षी सर्वत्र कोरोना महामारी ने थैमान घातले असुन खबदारीचा उपाय म्हणुन राष्ट्र संत जनार्दन समाधी मंदिर स्थानावर 27 डिसेंबर रोजी होणारा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार नसला.तरीही सुरक्षित अंतर ठेवून पाच मुलांना अनुष्ठानास  सोहळ्यास बसवण्यात येणार असुन आश्रमाचे प्रमुख संत रमेश गिरी महाराज,माधवगिरी महाराज मधुगिरी महाराज आदी संत गण  विधिवत पूजा करतील तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई  फुलांची सजावट करण्यात येणार आहे जनार्दन स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित अंतर ठेवून सॅनिटायझर व इतर बाबी यांचा अवलंब करून टप्प्याटप्प्याने दर्शनाची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांनी यावेळी दिली .

पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमटी व भाकरी चा महाप्रसाद मात्र होणार नाही याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी तसेच भाविक भक्तांना देणगी द्यायची असेल तर ती ऑनलाईन ही देऊ शकता अथवा आश्रमाच्या कार्यालयात द्यावी असे आवाहनही श्री चव्हाण व विश्वस्तांनी यावेळी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News