शेतीला अध्यात्माची जोड दिल्यास यश निश्चित - प.पु.संतोष भाऊ जाधव


शेतीला अध्यात्माची जोड दिल्यास यश निश्चित - प.पु.संतोष भाऊ जाधव

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोळपेवाडी - महाराष्ट्रातील कृषी विभाग आत्मा अंतर्गत शिवपद्मा पेट्रोलियम शेतकरी गटाचे उद्घाटन 

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बालसंस्कार केंद्र कारवाडी चे मार्गदर्शक प.पु.संतोष भाऊ जाधव, मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन साहेब,सरपंच सूर्यभानजी कोळपे. माहेगाव चे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चे मा.संचालक निवृत्ती पाटील कोळपे,प्रगतशील शेतकरी कचरू पाटील कोळपे,शिव पद्मा पेट्रोलियम शेतकरी परिवार गटाचेअध्यक्ष विक्रम पाटील कोळपे,शेतीशाळा मार्गदर्शक निलेश बिबवे कृषी सहाय्यक विजय अहिरे, शासनमान्य आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्राचे संचालक सतीश कदम कुंभारीचे माजी सरपंच विजयराव कदम,राजेंद्र पानगव्हाणे,आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 यावेळी शिवपद्मा पेट्रोलियम शेतकरी परिवाराच्या वतीने  शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प.पु. संतोष भाऊ जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले कि शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व विषमुक्त अन्न संकल्पना तसेच अध्यात्माची जोड शेतीला दिल्यास शेती निश्चित यशस्वी होऊ शकते असे मत संतोष जाधव त्यांनी व्यक्त केले

 जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्त्व माती परीक्षण घेण्याची पद्धती व तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या विविध योजना चित्रपटाच्या माध्यमातून मी विकेल ते पिकेल सारख्याअभियान शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा याबाबत त अविनाश चंदन साहेब यांनी आवाहन केले

  यावेळी शिवपद्मा पेट्रोलियम गटाच्या वतीने शेतकऱ्यांना लकी ड्रॉ व भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेगावचे माजी सरपंच सचिन कोळपे यांनी केले. तर विक्रम कोळपे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News