शेवगाव रोटरी ची "क्लब असेंम्बली" संपन्न


शेवगाव रोटरी ची "क्लब असेंम्बली" संपन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

             रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट RID 3132 चे सहप्रांतपाल मा. श्री. अभय राजे यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी ची क्लब असेंम्बली  हॉटेल बी-9 शेवगाव येथे नुकतीच पार पडली.  कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी श्री राजे यांनी रोटरी च्या जागतिक समाजकार्याविषयी  माहिती देऊन रोटरी च्या आचार संहितेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी  श्री राजे यांनी सर्व रोटरी सदस्यांना पोलिओ निर्मूलनासाठी तसेच इतर सामाजिक कार्याठी रोटरी इंटरनॅशनलला मदत करण्याचे आवाहन केले.

          कार्यक्रमासाठी सौ. उज्वला राजे, मा. श्री संजय झंवर, सौ. प्रिती झंवर, उपाध्यक्ष सौ मा मनिषा लड्डा, माजी सहप्रांतपाल डॉ श्री संजय लड्डा, खजिनदार डॉ पुरुषोत्तम बिहाणी, माजी अध्यक्ष डॉ गणेश चेके, डॉ भागनाथ काटे, श्री.अण्णासाहेब दिघे, माजी सेक्रेटरी डॉ आशिष लाहोटी, डॉ दिनेश राठी,श्री मनिष बाहेती, श्री काकासाहेब लांडे, श्री के वाय नजन, श्री केदारनाथ मंत्री, श्री पी ए फलके, श्री योगेश बाहेती, श्री अभिजीत काकडे, श्री सुधाकर जावळे, डॉ सुयोग बाहेती उपस्थित होते.

          प्रस्ताविकामध्ये रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटी च्या आतापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमाविषयी  सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी यांनी माहिती दिली. क्लब चे अध्यक्ष किसनराव माने यांनी सर्व ऊस्थितांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News