दौंड पोलीस अंतर्गत चोरांकडून हस्तगत केलेल्या दुचाकींचा होणार लिलाव,गाडी ओळखून घेऊन जाण्याचे दौंड पोलिसांचे आवाहन


दौंड पोलीस अंतर्गत चोरांकडून हस्तगत केलेल्या दुचाकींचा होणार लिलाव,गाडी ओळखून घेऊन जाण्याचे दौंड पोलिसांचे आवाहन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

प्रतिनिधी -- दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत बेवारस किंवा चोरत्यांकडून हस्तगत केलेल्या गाड्यांचा लिलाव होणार आहे,दौंड पोलीस ठाण्यात ८४ बेवारस दुचाक्या जमा आहेत. ज्या नागरिकांच्या  गाड्या चोरीला  गेलेल्या  आहेत  त्यांनी  दौंड  पोलीस स्टेशनला  येऊन  या गाड्यांची  पाहणी करावी व त्या गाड्यांमध्ये आपली गाडी आढळून आल्यास येत्या ८ दिवसांत सबळ पुरावे दाखल करून आपला मालकी हक्क दाखवून आपली दुचाकी ताब्यात घ्यावी. अन्यथा या दुचाकी वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे. दौंड शहर व परिसरात बेवारस आढळून आलेल्या ८४ दुचाक्या आहेत. यापूर्वी चोरीला गेलेल्या अनेक दुचाकीच्या मालकांनी दौंड पोलीस ठाण्यात भेट देऊन कागदपत्रांची पुर्तता करून आपली दुचाकी ताब्यात घेतली आहे. कोणाची दुचाकी चोरीला गेलेली असेल त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात समक्ष भेट द्यावी असे आवाहन दौंड पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहितीसाठी दौंड पोलीस ठाण्याचे कारकून पोलीस  नाईक बापु रोटे यांच्याशी ९६६५३५००९३ अथवा ०२११७-२६२३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती दौंड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News