प्रतिनिधी भालचंद्र महाडीक
पुणे | पिंपरी चिंचवडमध्ये एका भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पिंपळे गुरव येथील चंद्ररंग कॉर्नर इमारतीत ही घटना घडली आहे.
याप्रकरणी फरीनजहाँ विशाल शेख यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत माहिती मिळताच खासदार मेनका गांधी यांनी सांगवी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि एका संशयित आरोपीचं नाव निष्पन्न झालं.
दरम्यान, कुत्र्याला इमारतीवरून फेकणाऱ्या अज्ञाताला तातडीनं अटक करण्याच्या सूचना मेनका गांधी यांनी दिल्या आहेत.*