वंचित बहुजन आघाडीतर्फे शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन..


वंचित बहुजन आघाडीतर्फे शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन..

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

लॉकडाउनच्या काळात केंद्र शासनाने आपल्या संख्या बळाचा गैरवापर करून शेतकऱ्यांसाठी तीन विधेयक मंजूर करून घेतली. ही बिल शेतकरी वर्गासाठी घातक असून शेतक-याना देशोधडीला लावण्याच काम हे सरकार करत आहे.म्हणूनच हे विधेयक रद्द करण्यासाठी पंजाब, दिल्ली तसेच देशभरातील शेतकरी ठिय्या मांडून आहे. तसेच ह्या केंद्र सरकारने रेल्वेच खाजगीकरण करून भांडवलदारांचे खिसे भरण्याच कारस्थान सुरू केलं आहे. ह्या खाजगीकरणा मुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मालाची वाहतूक करन फार खर्चिक होईल त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे सर्वासर्वे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा उत्तर चे जिल्हा अध्यक्ष विशाल भैय्या कोळगे यांच्या नेतृत्त्वात शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालय  समोर वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले  उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन देण्यात आले .


या आंदोलनाला जिल्हा अध्यक्ष विशाल भैय्या कोळगे,जिल्हा महासचिव-डॉ.सुधीर क्षिरसागर, जिल्हा प्रवक्ते-डॉ.जालिंदर घिगे, सचिव-सुनील ब्राम्हणे,जिल्हा सल्लागार-शरदभाऊ खरात,जिल्हा सल्लागार-मधुकर साळवे कोषाअध्यक्ष-मुकुंद थोरात,भारतीय बौद्ध महासभेचे-गौतमजी पगारे,जिल्हा प्रसिद्ध प्रमुख-सुमित मकासरे,कोपरगाव तालुका अध्यक्ष-रणजित खरात  मा.तालुका अध्यक्ष-संदीप मोकळ(संगमनेर),मा.तालुका अध्यक्ष चरनदादा त्रिभुवन(श्रीरामपूर)राहता तालुका अध्यक्ष-किरण बोर्डे, शिर्डी शहर अध्यक्ष-अतिष शेजवळ,राहता ता.उपाध्यक्ष रमेश कसबे,विजय भोसले,दीपक लिहिणार,विलास लिहणार, सिद्धार्थ बनकर,विकी बनकर, देविदास बर्वे,अमित साठे, किशोर पठारे,किरण शेजवळ,अनिकेत पडघलमल,कपिल थोरात,कपिल थोरात,शुभम लोळगे,अमोल सोनवणे,संतोष त्रिभुवन,तसेच इतर पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News