मागासवर्गीय कुटुंबीयाच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा.. समस्त शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे, चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदन


मागासवर्गीय कुटुंबीयाच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा..    समस्त शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे, चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी  पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - निर्मलनगर येथील शिरसाठ मळ्यातील अलंकापुरी कॉलनीत राहत असलेल्या मागासवर्गीय (मातंग) कुटुंबीयाच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली. या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, अनंत लोखंडे, मंदा ठोकळ, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे, सिद्धार्थ आढाव, प्रियंका ठोकळ, चंद्रकांत काळोखे, लक्ष्मी ठोकळ, संदीप ठोकळ, विशाल ठोकळ, अमोल ठोकळ, मातंग एकता आंदोलनाचे महासचिव चंदूभाऊ काळोखे, सुशांत म्हस्के, विजय वडागळे, राम वडागळे, भगवान जगताप, सुनील उमाप, सुनील सकट, गौरव घोरपडे, रोहित काळोखे, सुमित भिंगारदिवे, महेश साठे, किरण साठे, सुमित गायकवाड, राहुल वैराळ, अंकुश मोहिते आदिंसह पिडीत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.निर्मलनगर येथील अलंकापुरी कॉलनीत मंदा अरुण ठोकळ अनेक वर्षापासून राहत आहे. या भागात एकच मागसवर्गीय (मातंग) समाजाचे घर आहे. मंगळवार दि.15 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता ठोकळ कुटुंबीयांच्या घरावर लॅण्ड माफिया दिपक सावंत आदिंसह आठ ते दहा व्यक्तींच्या टोळक्यांनी जीवघेणा हल्ला केला व पाच दुचाक्या गाड्या जाळण्यात आल्या काही वर्षापासून सदर आरोपी व त्यांच्या मित्रांनी ठोकळ कुटुंबीयांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम सातत्याने केले आहे. सदर भागांमध्ये खालच्या मागासवर्गीय जातीच्या लोकांनी शांत राहायचे, इतर कुठलाही कार्यक्रम घ्यायचा नाही, असे सांगितले. सदर मागासवर्गीय एकच कुटुंब असल्याने ते घाबरून शांत बसले. परंतु मंगळवारी ठोकळ कुटुंबीयांच्या घरी बारशाचा कार्यक्रम सुरु असताना सदर आरोपींनी सुरु असलेला कार्यक्रम बंद करण्यासाठी शिवीगाळ करुन धमकावले. कार्यक्रम बंद न केल्याचा राग धरुन ठोकळ कुटुंबीयांवर लाठी-काठी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला.सदर प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये ठोकळ कुटुंबीयांच्या सदस्यांना मारहाण करुन घराचे नुकसान केले. तर पाच वाहने जाळण्यात आली. यामध्ये अरुण ठोकळ हे गंभीर जखमी झाले असून, एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. सदर प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण कुटुंब या घटनेमुळे भयभीत झाले असून, दहशतीचे वातावरण आहे. हा प्रकार जातीयद्वेषातून घडला असला तरी देखील पोलीसांनी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही. सदर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे निर्मलनगर येथील शिरसाठ मळ्यातील अलंकापुरी कॉलनीत राहत असलेल्या मागासवर्गीय (मातंग) कुटुंबीयाच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील कार्यकर्त्यांनी  जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, अनंत लोखंडे, मंदा ठोकळ, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे, सिद्धार्थ आढाव, प्रियंका ठोकळ, चंद्रकांत काळोखे, लक्ष्मी ठोकळ, संदीप ठोकळ, विशाल ठोकळ, अमोल ठोकळ, मातंग एकता आंदोलनाचे महासचिव चंदूभाऊ काळोखे, सुशांत म्हस्के, विजय वडागळे, राम वडागळे, भगवान जगताप, सुनील उमाप, सुनील सकट, गौरव घोरपडे, रोहित काळोखे, सुमित भिंगारदिवे, महेश साठे, किरण साठे, सुमित गायकवाड, राहुल वैराळ, अंकुश मोहिते आदि. (छाया-साजिद शेख-नगर)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News