जळगाव सुपे येथील तुषार जगताप यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेश सरचिटणीस (कौशल्य विकास) पदी निवड


जळगाव सुपे येथील तुषार जगताप यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेश सरचिटणीस (कौशल्य विकास) पदी निवड

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील तुषार पोपटराव जगताप यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेश सरचिटणीस (कौशल्य विकास) पदी नुकतीच निवड करण्यात आली.

      सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या हस्ते जगताप यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावर सरचिटणीस (कौशल्य विकास) पदाची मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली ती मी योग्य रीतीने पार पाडेल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी कौशल्य विकासाच्या अनेक योजना राबवून पक्षाला अजून जास्त उंचीवर नेण्याचे काम करीत राहीन असे तुषार जगताप यांनी याप्रसंगी सांगितले.

      या कार्यक्रमावेळी आमदार अमोल मिटकरी, मा. खासदार आनंद परांजपे, पुणे विभागीय अध्यक्षा संध्या सोनवणे, सर्व विभागीय अध्यक्ष, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यानिवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News