उपद्रव माजून गावात शांतता बिघडवणाऱ्या दोन इसमांना केले तडीपार


उपद्रव माजून गावात शांतता बिघडवणाऱ्या दोन इसमांना केले तडीपार

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. सो,अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार गावात उपद्रव माजवणारे,शांतता बिघडवणारे तसेच जास्त गुन्हे असणारे इसमांना तडीपार करण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार सो.यांनी अशा गुन्हेगारांची कुंडली गोळा करण्याचे काम एकत्रित करून त्याबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवले होते.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नारायण पवार सो.यांनी केलेल्या

पाठपुराव्यामुळे वरिष्ठ कार्यालयामार्फत तडीपारी मंजूर झाली असून,त्याची तात्काळ अंबलबजावनी केली असून

सदरचे तडीपार दोन इसमनामे

१)निलेश खंडू शेडे २)योगेश खडू शेडे दोन्ही रा. गोपाळवाडी ता. दौंड, जि. पुणे यांना संपूर्ण दौंड तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तरी, या पुढील काळात देखील अशा वृत्तींना आळा घालण्यासाठी जास्त गुन्हे करणाऱ्या तसेच, शांतता बिघडवणाऱ्या इसमांना तडीपार करण्यात येणार आहे. त्याकरिता ची माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे.असे दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार सो. यांनी सांगितले. सदरची कार्यवाही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. श्री. अभिनव देशमुख सो.आदेशानवंये अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री मिलींद मोहिते सो,व दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली दौंडचे पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार सो. सहा फौजदार दिलीप भाकरे , पोलीस हवालदार आसिफ शेख,पोलीस .ना.सचिन बोराडे, पो. कॉ. अमोल गवळी,किरण राऊत ,अमोल देवकाते,शेखर झाडबुके,रविंद्र काळे यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News