साई श्रद्धा प्रतिष्ठाण तर्फे नवनियुक्त नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांचा सत्कार


साई श्रद्धा प्रतिष्ठाण तर्फे नवनियुक्त नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांचा सत्कार

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

भाजप उत्तर महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष तथा शिर्डीचे नूतन नगराध्यक्ष शिवाजी राजे गोंदकर आणि भाजपचे पदाधिकारी यांनी साई श्रध्दा प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक धनसिंग पाटील यांच्या निवासस्थानी भेटी दरम्यान छोटेखानी सत्कार कार्यक्रम झाला.

येथील साई श्रद्धा प्रतिष्ठाण (खानदेश प्रणित ) च्या वतीने यावेळी शिर्डीचे नूतन नगराध्यक्ष शिवाजी राजे गोंदकर यांसह उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, राहाता तालूका अध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, शिर्डी शहर अध्यक्ष सचिन शिंदे, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, उत्तर भारतीय आघाडी सेल जिल्हा संयोजक राजेश शर्मा,साई संस्थान ए. क्रे.को.सोसायटी चेअरमन यादवराव कोते, मा.नगरसेवक राजेंद्र हारीभाऊ गोंदकर,सर्जेराव काटकर या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. साई श्रध्दा प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक धनसिंग पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी दरम्यान हा कार्यक्रम झाला. भाजपचे संजय जैन, भाऊसाहेब राहींज, गणेश जाधव, तसेच साईश्रध्दा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय महाजन, उपाध्यक्ष आण्णासाहेब पवार, सल्लागार हिंमतराव होळकर,आसाराम वारे, सदस्य सुरेश वाणी, दत्तात्रय बडगे, राजेंद्र वाणी, प्रकाश वाघ, सुरेश चव्हाण, राजू सोमवंशी, ज्ञानेश्वर कुमावत, रतन बच्छे, भाऊसाहेब बच्छे, अर्जून पाटील, विकी पाटील, सागर पाटील, नरेंद्र सोळंकी, रमेश पाटील, सौरभ निर्मळ, प्रसाद चित्ते, साहील आव्हाड, रविंद्र सोनवणे, सागर जाधव हे या सत्कार करतांना उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News