अपुऱ्या घड्याला डब डब फार -विकास सोनवणे


अपुऱ्या घड्याला डब डब फार -विकास सोनवणे

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक- पडवी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व इतर मागण्या पुर्ण कराव्यात याकरिता ग्राहकपंचायतीचे ता अध्यक्ष प्रमोद भानुदास शितोळे दि ७/१२/२०२०रोजी उपोषणाला बसले होते.सहा दिवस झाले तरी प्रशासनाने कोणतीही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणुन दि ११/१२/२०२० रोजी रात्री सर्व ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला कि,उद्या दि. १२/१२/२०२० रोजी समाधानकारक लेखी उत्तर दिले नाही तर गटविकास अधिकारी यांच्यावर भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातले बद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी तक्रार द्यायची व उपोषण सोडायचं अस ठरलं. परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी दि १२/१२/२०२० रोजी सकाळी १० वाजले पासुन उपोषण स्थळी आता येतो मग येतो असे करत दुपारी तीन वाजता गट वि.अधीकारी स्वत:

न येता विस्तार अधिकारी आले आणि तेही कुचकामी पत्र घेऊन. आणि ते ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन बसले. नंतर थोड्या वेळाने शिवसेनेचे जि उपाध्यक्ष महेष पासलकर यांनी संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत चौकशी साठी १५ दि मुदत घेऊन, सहा दिवसांच्या उपोषणावर पाणी सोडले.

       आजपासून आचार संहिता चालू झाली आणि १५ जानेवारीला निवडणूक संपणार आहे. दिलेल्या मुदतीत सादर चौकशी पूर्ण होईल का?असे *विकास सोनवणे स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सांगितले.*

जाहिरात
Search
विडिओ
Recent News