महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी रियाज खान पठाण


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी रियाज खान पठाण

औरंगाबाद :-( राजमोहंमद शेख)महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी 

रियाज खान पठाण यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मराठवाडा प्रदेशाध्यक्ष श्री. विलासराव पठारे यांनी दिली.

 रियाज खान पठाण यांचा मागील वीस ते पंचवीस वर्षाच्या कार्याचा आढावा घेता व वृत्तपत्र क्षेत्रात केलेल्या लिखाणातून त्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरीची माहिती घेता पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांची औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून या नियुक्तीचे पत्र औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात त्यांना प्रधान केले.

     वैजापूर येथील रहिवाशी भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व साप्ताहिक सत्य परिवर्तन काळ या वृत्तपत्राचे संपादक श्री रियाज खान पठाण यांच्या निवडी बद्दल व त्यांच्या पुढील वाटचालीस पत्रकार संघाच्या वतीने शेख बरकत अली, विलासराव पठारे, अरुण त्रिभुवन, बी.के.सौदागर, अमीर भाई जागीरदार, शेख फकीर महंमद, राजमोहंमद शेख, सुभाषराव गायकवाड, अब्दुल्लाभाई चौधरी, इदरीसभाई शेख, दस्तगीर शहा, शहानवाज बेगमपूरे, उस्मानभाई शेख, आसिफ अली शेख, मन्सूरभाई मुलानी, सुखदेव केदारे,  राहुल गायकवाड, रवींद्र केदारे, विजय खरात, गुलाब भाई शेख (वायरमन),  सूर्यकांत गोसावी, वहाब खान, अनिल देवरे, मिलिंद शेंडगे, अफजल खान, हाजी हनिफभाई तांबोळी, सज्जादभाई पठाण, मुदस्सीर पटेल, मुरलीधर किंगर, अक्रम कुरेशी, शब्बीर कुरेशी, साईनाथ बनकर, लक्ष्मण साठे, अकबर भाई शेख, जावेदभाई शेख, अशोकराव कोपरे, अरुण बागुल, अमीरबेग मिर्झा, आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News