मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारला जोरदार धक्का मानला जात आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपनं पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.


मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारला जोरदार धक्का मानला जात आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपनं पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

मुंबई, 16 डिसेंबर: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं (metro car shed kanjurmarg) काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मुंबई महानगरक्षेत्र विकास प्राधिकरणाला (MMRDA) दिले आहे. कारशेडच्या जागेची स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारला जोरदार धक्का मानला जात आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपनं पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.  भाजपचे आमदार आशिष शेलार (bjp MLA Ashish Shelar)यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारवर थेट निशाणा साधला आहे. स्वत: च्या अहंकारातून अजून मुंबईकरांचं किती नुकसान करणार? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

…मेट्रो कारशेडचे काम थांबवा, हायकोर्टाच्या आदेशावर आदित्य ठाकरे म्हणाले…

आरेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत. त्यानंतर कांजुरमार्ग मेट्रो कारशेडबाबत स्वतः च नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल मान्य नाही. आता मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय तरी मान्य करणार का? स्वतःच्या अहंकारातून अजून मुंबईकरांचे किती नुकसान करणार? अहंकार! अहंकार आणि अहंकार!! अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News