दौंड तालुक्यात वाळू माफियांवर धडक कारवाई 50 लाखांचा मुद्देमाल जप्त,गुन्हेगारांची गय केली जाणार नाही नारायण पवार


दौंड तालुक्यात वाळू माफियांवर धडक कारवाई 50 लाखांचा मुद्देमाल जप्त,गुन्हेगारांची गय केली जाणार नाही नारायण पवार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

प्रतिनिधी-- दौंड तालुक्यातील खोरवडी येथे चोरटा वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार कारवाई केली असता 50,30,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार बोलताना सांगितले कोणत्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.दौंड तालुक्यात पुन्हा वाळू चोरीचा प्रश्न चर्चेत राहिला असून दौंड पोलीस स्टेशनचे सूत्रे नारायण पवार यांनी हाती घेतल्यापासून वाळू चोरांचे कंबरडे त्यांनी मोडण्यास सुरुवात केली आहे.गेल्याच महिन्यात १ कोटी १५ लाख चा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर विविध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे.दौंड पोलिस सतत कारवाई करत असताना वाळू चोरीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले असताना खोरवडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे वाळू उपसा करून वाळू चोरी करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांना मिळताच त्वरित पोलिसांनी छापा टाकून १ बोट ,१ जेसीबी,६ ट्रक एकूण ५२ लाख ३० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यावरील चालक आणि मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून महसूल विभागाच्या मदतीने यांत्रिक बोट जागीच नष्ट करण्यात आले आहे अशी फिर्याद अजित भगवानराव मोहिते मंडल अधिकारी देउळगावराजे ता. दौंड जिल्हा पुणे.यांनी दिली असून सदरचा तपास सहा.फौज. दिलीप भाकरे हे करीत आहेत.सदरची कार्यवाही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलींद मोहिते व दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात पो.हवा असिफ शेख,पो.ना.अण्णासाहेब देशमुख,पो.ना.सुनील सस्ते, पो.काँ.अमोल गवळी,किरण राऊत,अमोल देवकाते,शेखर झाडबुके, रविंद्र काळे राहुल वाघ यांनी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News