दौंड नगर परिषदच्या उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक विलास शितोळे


दौंड नगर परिषदच्या उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक विलास शितोळे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

दौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक विलास पांडुरंग शितोळे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. गेली 19 वर्षे झाले विलास शितोळे दौंड नगरपरिषद मध्ये प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी विशेष समित्यांचे सभापती पद म्हणून सुद्धा बरेच वर्ष पद भूषवले आहे. विस्तारित भागाचे प्रस्थापित नगरसेवक म्हणून दौंड शहरांमध्ये त्यांची ओळख आहे माजी आमदार रमेश थोरात यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते. दौंड तालुक्यातील रोटी या छोट्याशा गावातून येऊन नगर नगरपालिकेमध्ये गेली 19 वर्षे झाले नगरसेवक म्हणून ते कार्यरत आहेत. दांडगा अनुभव असलेले असे ज्येष्ठ नगरसेवक विलास शितोळे यांची आज निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, ज्येष्ठ विधीतज्ञ अजित बलदोटा, मावळते उपनगराध्यक्ष वसीम शेख, जेष्ठ नगरसेवक बादशाहभाई शेख  तसेच नगरपरिषदेतील शिवसेना राष्ट्रवादी युतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News