दौंड नगरपरिषदच्या विरोधात शिवसेनेचे जागरण गोंधळ,रस्तेकामात ठेकेदारांची मनमानी


दौंड नगरपरिषदच्या विरोधात शिवसेनेचे जागरण गोंधळ,रस्तेकामात ठेकेदारांची मनमानी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहरातील अंतर्गत रस्त्याची कामे दोन वर्षांपासून सुरू आहेत,ठेकेदार त्याच्या वेळेनुसार कामे करत असल्यामुळे व्यवसायिक हैराण झाले आहेत, छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली त्यात कोरोनाची भर पडली,  दौंड शहरातील झालेली रस्त्याची दुरवस्था व ठेकेदाराचा मनमानी कारभार ,दौंड शहरातील वाढते कचरा व घाणीचे साम्राज्य, दुषीत पाणीपुरवठा ,मोकाट जनावरे , त्यामुळे होणारी नागरिकांना दुखापत  दौंड नगरपरिषदचा नियोजन शुन्य कारभाराला लोक त्रासले असून दौंड शहर वैतागले आहे. याला वाचा फोडण्यासाठी शिवसेना विधानसभा नेते अनिल  सोनवणे व संतोष  जगताप यांच्या नेतृत्वाखाली  दौंड नगरपरिषद समोर आज बुधवार दि. १६/१२/२० रोजी सकाळी ११ वा. जागरण गोंधळाचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या वतीने दौंड नगरपरिषदचा जाहीर निषेध करण्यात आला व नगरपरिषद  प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी  शिवसेना नगरसेविका अनिता दळवी,नगरसेविका हेमलता परदेशी, अमोल जगताप, संदीप बारटक्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News