संत साईबाबा व संत गंगागिरी महाराज यांचा अध्यात्मिक माहितीपटाचा प्रकाशन सोहळा!


संत साईबाबा व संत गंगागिरी महाराज यांचा अध्यात्मिक माहितीपटाचा प्रकाशन सोहळा!

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे,( प्रतिनिधी)

संतगगनगिरी महाराज व संत श्री साईनाथ महाराज यांचा अनोन्य अध्यात्मिक संबंधांना उजाळा देणारा अनुबंध या माहितीपटाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता द्वारकामाई वृद्धाश्रम, कंनकुरी रोड ,शिर्डी येथे होणार आहे , श्री संत साईबाबा व श्री संत गंगागिरी महाराज यांचा हयात असताना अध्यात्मिक असा संबंध आला होता ,त्यातून अनुबंध हा माहितीपट तयार करण्यात आला आहे, या माहितीपटाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी होत आहे, श्रीक्षेत्र सरला बेट चे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे हे राहणार आहेत तर या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे व राहाता येथील ज्येष्ठ पत्रकार सतीशराव वैजापूरकर हे उपस्थित राहणार आहेत, तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डी येथे झालेल्या 171 वा संत गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष व कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News