श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती उत्सव साधेपणाने


श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती उत्सव साधेपणाने

नगर प्रतिनिधी संजय सावंत :

नेवासे तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दरवर्षी उत्साहात साजरा केला जाणारा भगवान दत्तात्रेय जन्मसोहळा यावर्षी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची श्रीदत्त जयंती यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थांनचे मठाधिपती महंत भास्करगिरजी महाराज यांनी दिली. दरवर्षी श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रेय जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. तथापि कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयानुसार या वर्षी श्री दत्त जयंतीनिमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम हे श्रींच्या मंदिरामध्ये स्थानिक सेवेकरी तथा विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत पार पडणार असून नित्याभिषेकही स्थगित ठेवलेले आहेत. बाहेरील यात्रा संपूर्णपणे रद्द ठेवण्यात आलेली आहे. दत्त जयंती सप्ताहादरम्यान दुरून दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली असून भगवान दत्तात्रेय जन्मदिनी म्हणजेच मंगळवार 29 डिसेंबरला दुपारी 4 पासून महाद्वार बंद ठेवण्यात येणार आहे. श्री दत्त जन्मसोहळा श्री दत्त मंदिरातच होणार असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, श्री दत्त जन्मसोहळा सर्वाना पाहता यावा यासाठी मंदिर परिसर तसेच पार्किंगमध्ये ठिकठिकाणी LED SCREEN लावण्यात येतील. यात्रेसाठी येणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी या वर्षी आपापली दुकाने आणू नये. दिंडी सोहळे आणणाऱ्या भाविकांनी दिंडी सोहळे रद्द करावेत आणि भाविकांनी मंदिर परिसरामध्ये मास्क तथा स्वच्छतेचे व सामाजिक अंतराचे नियम कटाक्षाने पाळावेत व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानने काढलेल्या पत्राद्वारे केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News