नगर(-प्रतिनिधी संजय सावंत) कोरोना महामारीमुळे बंद असलेले वाडिया पार्क व इतर मैदाने व्यायामासाठी व नागरिकांना फिरण्यासाठी खुली करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिले आहेत ,त्यामुळे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे .
राज्य सरकारने कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील क्रीडा संकुले ,स्टेडियम व मोकळ्या जागा खुल्या करण्याचे निर्देश दिलेले होते , त्यानंतरहि शहरातील वाडिया पार्कसह काही मैदाने वापरासाठी बंदच होती .या बाबत संभाजी कदम यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले होते व नागरिकांना फिरण्यासाठी व व्यायामासाठी खुली करण्याची मागणी केलीय होती .त्याची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पत्र दिले आहे व शासन आदेश व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात यावी वैयक्तिक व्यायामासाठी परवानगी देतानाच शासनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे ,अशा सूचनाही निचित यांनी दिल्या आहेत त्यामुळे संभाजी कदम यांच्या मागणीला यश आले आहे