विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत नायब सुभेदार दिगंबर जोर्वेकर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न..!!


विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत नायब सुभेदार दिगंबर जोर्वेकर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न..!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील नायब सुभेदार मा.श्री.दिगंबरजी दशरथ जोर्वेकर हे सैन्यदलातील सेवापूर्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला असुन या निमित्त कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन श्री.विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे हे उपस्थित होते.

या प्रसंगी नायब सुभेदार दिगंबरजी जोर्वेकर त्यांचे वडील दशरथजी गंगाधर जोर्वेकर,आई सौ.मीराबाई दशरथ जोर्वेकर,पत्नी सौ.शीतल दिगंबर जोर्वेकर आदींचा सत्कार करण्यात आला.

 या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतांना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले सैन्यात सेवा करणे म्हणजे एखाद्या ठिकाणी नोकरी करतो त्यावेळी लोक म्हणतात की नोकरीला आहे परंतु जेव्हा सैन्यात भरती होतो तेव्हा जनता त्याकडे सैन्यात सेवा देत आहे असे म्हणले जाते.याचे कारण सेवा ही त्यागाचे प्रतीक आहे,जीवावर उदार होऊन सीमेवर लढणे हे शौर्य व अभिमानाचे जीवन असते

आजच्या युवकांनी सैन्यात भरती होणे म्हणजे सहज समजू नये कारण तिथे सैनिक बांधवांच्या कुटूंबाचा मनाचा धाडसीपणा हे मोठे उदार कार्य आहे व प्रत्यक्षात सीमेवर जे आयुष्य ते जगतात ते अत्यंत कठीण असून आपण आदर्श घेऊन सैनिकांना नेहमी आदर्श मानून जीवन घडवले पाहिजे.

माजी मंत्री कोल्हे साहेब यांनी सैन्यभरती होण्यासाठी कोपरगाव तालुक्यात मोठे कार्य उभे केले होते ती भरती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आपण तांत्रिक दृष्ट्या माहिती घेऊन पाठपुरावा करु असेही विवेकभैय्या कोल्हे म्हणाले

ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू लढवैय्ये वीर येसाजी कंक यांच्या प्रमाने राष्ट्रसाठी प्राणपणाने सीमेवर लढणारे सैनिक बांधव हे आजच्या काळातील वीर येसाजी कंकच आहेत.

दिगंबरजी जोर्वेकर यांना भावी वाटचालीसाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कुटूंबियांप्रती आदर व्यक्त केला.

याप्रसंगी मा.भास्करराव भिंगारे,कारभारी नाना आगवन,नवनाथ पा.आगवण,छबुराव आहेर (सरपंच),संतोषराव भिंगारे,लक्ष्मणराव शेळके,डॉ.सुनील देसाई,उपसरपंच रवींद्र आगवण, देविदास भिंगारे,अनिल डोखे, गणेश भिंगारे,अरुण भिंगारे,भास्करशेठ शहाणे,सांडूभाई पठाण,रघुनाथराव भिंगारे,सोमनाथ फापाळे,आप्पासाहेब आगवण,विकासभाऊ शिंदे,एक्स सर्व्हिस मॅन बाळासाहेब उदावंत,बाळासाहेब ढवळे,शिवाजीराव जाधव,संजय आगवण,चंद्रकांत भिंगारे आदीं.सह ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News