कर्जपरतफेडीची क्षमता असूनही जाणूनबुजून कर्जफेड न करणार्‍या थकबाकीदारांची (wilful defaulters) नावे माहिती अधिकारात रिझर्व्ह बॅंकेकडून मिळाली.


कर्जपरतफेडीची क्षमता असूनही जाणूनबुजून कर्जफेड न करणार्‍या थकबाकीदारांची (wilful defaulters) नावे माहिती अधिकारात रिझर्व्ह बॅंकेकडून मिळाली.

100  कोटींहून अधिक थकबाकी असणाऱ्या 264 बड्यांकडे तब्बल एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत

 प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

कर्जपरतफेडीची क्षमता असूनही जाणूनबुजून कर्जफेड न करणार्‍या  किंवा कर्जाचे पैसे siphon out केल्याची बँकेची खात्री पटलेल्या 1 कोटीहून अधिक कर्ज थकबाकी असणाऱ्या  थकबाकीदारांची (wilful defaulters) यादी प्रत्येक बँकेने रिझर्व्ह बँकेला तसेच क्रेडीट रेटींग कंपन्यांना कळवणे रिझर्व्ह बँकेने केलेल्या नियमावलीनुसार बंधनकारक आहे.  त्यानुसार मी रिझर्व्ह बँकेकडे माहिती अधिकारात राष्ट्रीयीकृत बँकांनी दिलेली अशा wilful defaulters ची अद्ययावत यादी व त्या प्रत्येकाचे थकीत कर्ज याची माहिती मागितली. रिझर्व्ह बँकेने  30 जून 2020 रोजची अशी 1913 कर्ज थकबाकीदारांची यादी मला दिली.  या सर्वांची मिळून थकबाकी 1,46,286 कोटी रुपये आहे.  त्यातील 1000 कोटींच्या वर थकबाकी असणारे wilful defaulters 23 असून त्यांची थकबाकी 43,327 कोटी रुपये आहे.   500 ते 1000 कोटींच्या दरम्यान थकबाकी असणारे wilful defaulters 34 असून त्यांची थकबाकी  22105 कोटी रुपये आहे तर 100 ते 500 कोटींच्या दरम्यान थकबाकी असणारे wilful defaulters 207 असून त्यांची थकबाकी  43095 कोटी रुपयेआहे. याचाच अर्थ 100 कोटींच्या वर थकबाकी असणारे wilful defaulters 264 असून त्यांची थकबाकी 1,08,527 कोटी रुपये आहे.  या सर्वांवर संबंधित बँकांनी खटले दाखल केले आहेत. 

खरं तर या सर्वांबद्दल कर्जपरतफेडीची क्षमता असूनही जाणूनबुजून कर्जफेड नसल्याची  किंवा कर्जाचे पैसे siphon out केल्याची संबंधित बँकांची खात्री पटली असल्यानेच त्यांना wilful defaulter म्हणून घोषित करण्यात आले आहे आणी रिझर्व्ह बँकेला याद्या पाठवण्यात आल्या,  असं असताना रिझर्व्ह बँक ही माहिती स्वतःहून संकेतस्थळावर का प्रसिद्ध करत नाही? 

      आता किमान या 100  कोटींहून अधिक थकबाकी असणाऱ्या 264 लोकांवरील कोर्ट केसेस जलद गतीने चालल्या तरी त्यातून तब्बल एक लाख कोटी रुपये बँकांना मिळतील.  यासाठी अर्थातच बँकांची इच्छाशक्ती हवीच पण सरकारनेही पावले उचलणे आवश्यक आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News