कारवाईत एनसीबी पथक आणि रेल्वे पोलिसांनी दोन तरुणांसह एका महिलेलाही अटक केली आहे.


कारवाईत एनसीबी पथक आणि रेल्वे पोलिसांनी दोन तरुणांसह एका महिलेलाही अटक केली आहे.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

मुंबई, 14 डिसेंबर :  मुंबईतील कुर्ला (Kurla) लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात अंमली विरोधी पथकाने (Narcotics Control Bureau – NCB) धडक कारवाई करत तब्बल 2 कोटी रुपये किंमतीचा चरस (Drug) जप्त करण्यात आला आहे. तसंच  या कारवाईत एनसीबी पथक आणि रेल्वे पोलिसांनी दोन तरुणांसह एका महिलेलाही अटक केली आहे.

अंमली विरोधी पथक (NCB)ला गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेही कारवाई करण्यात आली. कुर्ला लोकमान्य टिळक र्मिनसमधून (Lokmanya Tilak Terminus – LTT) दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 6 किलो 628 ग्रॅम वजनी काश्मिरी चरस हस्तगत करण्यात आले होते.  आफताब शेख (वय 28), साबिर सय्यद अली (30) आणि शमीम बानो( 30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे, असे वृत्त दैनिक दिव्य मराठीने दिले आहे.

हे तिन्ही आरोपी कुर्ला पूर्व भागातील रहिवासी आहे. त्यांच्याकडे जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ हा काश्मिरी चरस होता. तिन्ही आरोपींना याआधीही अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय होता. यावेळी एनसीबीने तिघांकडे छापा टाकला असता तब्बल 2 कोटी किंमतीचे चरस सापडले.

तर रविवारी सुद्धा एनसीबीने मुंबईतील इतर ठिकाणी छापे टाकून दोन जणांना अटक केली आहे. दोघांना चरस विकत असताना रंगेहाथ पकडण्यात एनसीबीला यश आले. हे दोन्ही आरोपी दिल्लीतील निजामुद्दीनहून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. तपासादरम्यान संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे दोघांना ताब्यात घेतले होते. एनसीबीने तपासणी केली असता चरस असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा अधिक तपास एनसीबी पथक करत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News