बहुजनांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणा-या विरोधात चक्री उपोषण जिल्हा अधिकारी कार्यालया समोर सुरू


बहुजनांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणा-या विरोधात चक्री उपोषण जिल्हा अधिकारी कार्यालया समोर सुरू

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

 १ जानेवारी १८१८ च्या भिमाकोरेगाव येथील लढाईशी कसलाही संबंध नसताना देखील विजयस्तंभावर बेकायदेशीर अतिक्रमण करत १९६५ व १९७१ च्या भारत-चीन आणि भारत-पाक युद्धातील शाहिद जवानांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे.

आमच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या विजयस्तंभावर आशा प्रकारची घुसखोरी करणे हा भिमाकोरेगाव लढाईतील शूरवीरांचा आणि त्या शाहिद जवानांचा अपमान आहे.म्हणून ती पाटी काढावी या मागणी साठी बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय भारतदादा अहिवळे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत चक्री उपोषण सुरू झाले आहे.दरम्यान आज दिवसभरात या उपोषणाला पुणे जिल्ह्यातील विविध ३२ राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News