दिग्रस चे ठाणेदार यांचे विरोधात कोब्रा कमांडो गौतम धवने यांची "आता थेट न्यायासाठी" महामहिम राष्ट्रपती यांच्या कोर्टात धाव


दिग्रस चे ठाणेदार यांचे विरोधात कोब्रा कमांडो गौतम धवने  यांची "आता थेट न्यायासाठी"  महामहिम राष्ट्रपती  यांच्या कोर्टात धाव

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक (यवतमाळ)

भारतीय सैन्यात झारखंड येथे नक्षल भागात कार्यरत असलेले व यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील लायगव्हाण येथील कोब्रा कमांडो गौतम धवने यांनी दिग्रस चे ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी कोरोना महामारी च्या काळात कडक संचारबंदी लागू असतांना दिनांक  1 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या कार्यालयात स्वतःचा वाढदिवस साजरा करून संचार बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे सह मुख्य सचिव, प्रधान गृहसचिव,( मंत्रालय), यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक , विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, पोलीस महासंचालक, मुंबई( महाराष्ट्र ) यांना तक्रारी दिल्या होत्या मात्र : आतापर्यंत  त्यांनी काहीच कारवाई न केल्यामुळे कंटाळून आता त्यांनी कारवाईसाठी व न्यायासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्यासह भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्या कोर्टात धाव घेतली आहे त्यामुळे हे प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतानाच आता थेट दिल्ली पर्यंत गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांनी या तक्रारी मध्ये असे म्हटले आहे की संपूर्ण देश हा कोरोना महामारीने होरपळून निघत असताना दिग्रस चे ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी कडक संचारबंदी लागू असताना यवतमाळ जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणाची त्यांनी गंभीर दखल घेऊन  कायदा हा  काय फक्त सामान्य गोरगरीब जनतेसाठीच आहे का असा सवाल देखील त्यांनी  तक्रारीमध्ये व्यक्त केला आहे.या प्रकरणी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी दिल्या होत्या परंतु वरिष्ठ अधिकारी हे काहीच कारवाई न करता ठाणेदार ला पाठीशी घालत असल्याने त्यांनी  आता कारवाईसाठी थेट महामहीम राष्ट्रपती  भारत सरकार , यांच्या कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी या तक्रारारी मध्ये नमूद केले आहे जो पर्यंत ठाणेदार वर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांची बदली करण्यात येऊ नये अशा आशयाची तक्रार  07/12/2020 रोजी केलेली आहे,

 त्यामुळे या प्रकरणांमध्ये केंद्रीय गृहमंत्री, प्रधानमंत्री  व महामहीम राष्ट्रपती   हे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News