शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसचे प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन


शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसचे प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन

मिलिंद शेंडगे

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा काँग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी युवा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले असून युवा शहर अध्यक्ष विशाल मालके, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासहित सुमित नवले, इंद्रजित साळुंखे, निखिल कविश्वर, प्रताप काळे, हृषिकेश साठे, अभिजित रोकडे, कुणाल काळे, प्रताप शिलीमकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

     सकाळी ११:३० च्या सुमारास पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर जमले आणि तेथे बसून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सोमवारी पुण्यात पाऊस पडला; परंतु या पावसातही कामगार तिथेच बसून घोषणाबाजी करत राहिले. तब्बल एक तासानंतर कोथरूड पोलिस येथे आले आणि सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News