बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ॲग्रीयुग आर्गोटेक प्रा.लि.यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासाळवाडी ता.(बारामती) याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बांबूचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ॲग्रीयुग आर्गोटेकचे चेअरमन व माजी सरपंच तात्यासाहेब देडे, विद्यमान सरपंच भाग्यश्री ठोंबरे, सदस्या पल्लवी मासाळ, तानाजी मासाळ, महादेव मासाळ, अशोक मासाळ, बबन बंडगर, नितीन मासाळ, फौजी संदीप ठोबरे, तानाजी देडे, पोपट ठोबरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन ढोले इ. उपस्थित होते.