कल्याण रोड परिसरातील वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी... नगरसेवक सचिन शिंदे यांची मागणी


कल्याण रोड परिसरातील वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी... नगरसेवक सचिन शिंदे यांची मागणी

कल्याण रोड परिसरात चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, पोलिसांची या भागात गस्त वाढविण्यात यावी, या मागणीचे निवेदन नगरसेवक सचिन शिंदे यांनी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर यांना दिले. याप्रसंगी उत्तमराव राजळे, दिनकर आघाव, शेखर उंडे, बाळासाहेब लवांडे, गणेश जंगम, जयप्रकाश डिडवाणीया, दत्तात्रय शिरसाठ, सतीश गिते, राहुल चौरे, वैद्य सर आदि. (छाया : राजु खरपुडे    

 नगर (-प्रतिनिधी संजय सावंत) कल्याण रोड परिसरात गेल्या 15-20 दिवसांपासून चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, पोलिसांची या भागात गस्त वाढविण्यात यावी, या मागणीचे निवेदन नगरसेवक सचिन शिंदे यांनी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर यांना दिले. याप्रसंगी उत्तमराव राजळे, दिनकर आघाव, शेखर उंडे, बाळासाहेब लवांडे, गणेश जंगम, जयप्रकाश डिडवाणीया, दत्तात्रय शिरसाठ, सतीश गिते, राहुल चौरे, वैद्य सर आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


     नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कल्याण रोड परिसरात विद्या कॉलनी, समतानगर, पावन म्हसोबानगर, हॅपीथॅट, आदर्शनगर, आनंद पार्क, सुयोग पार्क, अनुसायानगर, अमितनगर, जाधवनगर, रिया पार्क, श्रीकृष्णनगर, मेवाडनगर, शिवाजीनगर परिसरात अनेक लहान-मोठ्या वसाहत असून, यातील बहुतांशी लोक नोकरदार असल्याने कामानिमित्त बाहेर असतात. याचा फायदा घेत चोरटे हे दिवसासुद्धा घरफोड्या करुन चोर्‍या करत आहेत. रात्री तर हे चोरटे हत्यारांसह वावरतात. त्यामुळे येथील नगारिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी रात्रीची पोलिसांची गस्त वाढवावी तसेच या भागास भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, गेल्या काहि दिवसांपासून होत असलेल्या चोरी घटना व चोरटे  सीसीटीव्हीमध्येही दिसत आहे. त्याचप्रमाणे येथील काही भागातील नागरिका रात्रीची गस्तही घालत आहेत. पोलिसांचा राऊंड होत असला तरी पोलिसांची आणखी गस्त वाढविण्याची गरज असल्याचे सचिन शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच तोफखाना पोलिसांना सुद्धा निवेदन देण्यात आले 


-------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News