कै.श्रीनिवास कनोरे यांच्या स्मरणार्थ मोतीबिंदू शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद......शिबिरामुळे गरीब व गरजू रुग्णांना दिलासा-अरविंद धिरडे


कै.श्रीनिवास कनोरे यांच्या स्मरणार्थ मोतीबिंदू शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद......शिबिरामुळे गरीब व गरजू रुग्णांना दिलासा-अरविंद धिरडे

बागडपट्टी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात साईसेवा प्रतिष्ठान ट्रस्ट अ.नगर,के.के.आय बुधरानी हॉस्पिटल पुणे,स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ व जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने कै.श्रीनिवास कनोरे यांच्या समरणार्थ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर प्रसंगी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे,श्रीमती मृणाल कनोरे,सौ.अर्चना झिंजे,स्वकुळसाळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश अष्टेकर,वनिता पाटेकर,विक्रम पाठक, संजय सांगावकर,जितेंद्र लांडगे,प्रदीप पाटेकर,सुनील पावले,विठ्ठलराव पाठक,सचिन मडके,साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे,किरण डफळ आदी.(छाया -अमोल भांबरकर)        

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) नेत्र सेवा हिच खरी रुग्णसेवा आहे.सध्याच्या काळात न परवडणारा औषधाचा खर्च व ऑपरेशनचा खर्च यामुळे अनेक वृद्धांना अंधत्व आले आहे.डोळा हा महत्वाचा अवयव असल्याने वेळीच नेत्र तपासणी होणे व उपचार होणे आवश्यक आहे.कै.श्रीनिवास कनोरे यांचा स्मृतिदिनानिमित्त नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरामुळे गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे.असे प्रतिपादन स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे यांनी केले आहे.                                                                                          बागडपट्टी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात साईसेवा प्रतिष्ठान ट्रस्ट अ.नगर,के.के.आय बुधरानी हॉस्पिटल पुणे ,स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ व जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने कै.श्रीनिवास कनोरे यांच्या समरणार्थ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अरविंद धिरडे बोलत होते.यावेळी जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळाच्या श्रीमती मृणाल कनोरे,सौ.अर्चना झिंजे,स्वकुळसाळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश अष्टेकर,महिला मंचच्या अध्यक्ष वनिता पाटेकर,महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष विक्रम पाठक,विश्वस्त संजय सांगावकर,जितेंद्र लांडगे,प्रदीप पाटेकर, जिव्हाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पावले,खजिनदार विठ्ठलराव पाठक,जिव्हेश्वर तरुण मंडळाचे सचिन मडके,साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे,जय जिव्हेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण डफळ,सुषमा साळी,स्नेहल कोशल्ये आदी उपस्थित होते.     या शिबिरात १२४ रुग्णाची नेत्र तपासणी करण्यात आली तर ५४ रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया के.के.आय बुधरानी हॉस्पिटल पुणे येथे करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक गणेश अष्टेकर यांनी केले तर स्वागत किरण डफळ व आभार साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे यांनी मानले.                          शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन भागवत,महेश भोपळे,सुमित ढोकळे,वैभव खाडे,ओंकार मिसाळ,अवधूत पाटेकर, कुमार झोन्ड,वैभव आहेर,गणेश ओहोळ आदींनी परिश्रम घेतले.                                                           

जाहिरात
Search
विडिओ
Recent News