स्मितसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन,150 जॉबकार्ड चे वाटप


स्मितसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन,150 जॉबकार्ड चे वाटप

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

प्रतिनिधी -- वाढदिवसाच्या निमिताने 12 डिसेंबर 2020 सौ स्मिताताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकट काळात स्मितसेवा फौंडेशन आयोजित भव्य रोजगार मेळावा व 150 जॉब कार्ड वाटप (नोकरी मार्गदर्शक कार्ड वाटप) केले.  कोरोना मुळे बेरोजगारीचे प्रमाण खूपच वाढले आहे. बेरोजगारी हा आत्ताचा ज्वलंत प्रश्न आहे या प्रश्नावर मार्ग सोडविण्यासाठी बारा डिसेंबर 2020 रोजी स्मितसेवा फाउंडेशन तर्फे भव्य असा (रोजगार मेळावा) नोकरी महोत्सव घेण्यात आला. यावेळी 500 उमेदवारांनी मोफत रजिस्ट्रेशन केले. यापैकी 250 जणांना जरी जॉब लागला, एका कुटुंबात चार अशी हजार लोकांचा उदरनिर्वाह होणार अशी भावना सौ स्मिताताई गायकवाड यांनी व्यक्त केली.शिवाय या कार्यक्रमांमध्ये 150 जॉबकार्ड वाटण्यात आले. या जॉब कार्ड द्वारे 365 दिवस आठ ते दहा vacancies उमेदवारास मिळतील. यामध्ये बारा कंपन्यानी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटन Advo.तोसिफ शेख - केंद्रीय महासचिव यांनी केले. यावेळी माननीय श्री भूषण तुपे, श्री राहुल शेवाळे, श्री योगेश पिंगळे, श्री जीवन जाधव, श्री संदीप लोणकर, श्री प्रितेश गवळी, श्री प्रशांत दिंडोरकर, श्री अभिजीत बोराटे , advo.  क्रांती सहाणे, advo. सुरज जाधव, श्री संजय आण्णा सातव,  श्री विकास भुजबळ, श्री संतोष कोद्रे, श्री पंढरीनाथ बनकर, डॉ. रोहित बोरकर, श्री शैलेंद्र बेल्हेकर, श्री अमोल दुगाने, श्री महेश ससाणे, श्री किशोर भोर, श्री पंकज दर्शिले, श्री अमोल भोंगळे, श्री दिपक भोसले, श्री पितांबर धिवार, श्री अशोक सोरगावीकर, श्री नरेंद्र चव्हाण, श्री धर्मेंद्र इंगळे, श्री विजय कड, श्री प्रविण कवडे, श्री श्रीकांत दळवी, श्री सायकर सर, श्री विजय नायर, सौ प्रितीताई म्हेत्रे, सौ  दीपाली कवडे, सौ ललिता चिल्लाळ, सौ अनिता टिळेकर इत्यादी उपस्थित होते.

स्मितसेवा सदस्य श्री तुषार गायकवाड, दर्शना भुजबळ, सौ आशा भूमकर, कु. कीर्ती खोमणे, अनिता हिंगणे, सौ. संध्या पवार, श्री मेरगळ सर, श्री संजय जगताप, श्रीराम सातपुते, तोसनिया शेख, शर्मिला डांगमाळी, शिवसाहित्य प्रतिष्ठान, कला परिवार हडपसर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News