कोपरगावात वंचित बहुजन आघाडीची कोपरगाव बैठक संपन्न!! तालुका व शहर कार्यकरणी जाहिर!


कोपरगावात वंचित बहुजन आघाडीची कोपरगाव बैठक संपन्न!! तालुका व शहर कार्यकरणी जाहिर!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी:

कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीची नुकतीच बैठक संपन्न झाली असुन या बैठकीला मा.जिल्हाअध्यक्ष व सल्लागार शरद खरात,जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव सुधीर क्षीरसागर ,सचिव सुनिल ब्राम्हणे, जिल्हा उपाध्यक्ष बबलु जावळे यांची प्रमुख  उपस्थिती होती.

श्रध्देय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशाने जिल्हाची व तालुक्याची नविन कार्यकरणी जाहिर झाली असुन या बैठकीत  आणि शहराची कार्यकारणी जाहिर झाली अाहे.या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अनिल तुकाराम बनसोडे यांची निवड करण्यात आली तर रमेश बागुल यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.तसेच कोपरगाव तालुका अध्यक्षपदी रणजित एकनाथ खरात,कोपरगाव तालुका महासचिवपदी मेजर रवींद्र पोपट आहिरे ,कोपरगाव शहराध्यक्ष पदी राजेंद्र सदाशिव जाधव,कोपरगाव शहर महासचिवपदी रवींद्र बाळासाहेब भालेराव यांची निवड झाली याप्रसंगी शरद खरात यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News