अरविंद केजरीवाल शेतकऱ्यांसाठी करणार एक दिवसाचा उपवास..


अरविंद केजरीवाल शेतकऱ्यांसाठी करणार एक दिवसाचा उपवास..

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक दिवसाचा उपवास करणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यांनी आपच्या म्हणजेच आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि देशवासीयांनाही उद्याचा एक दिवस शेतकऱ्यांसाठी उपवास करण्याचं आवाहन केलं आहे. आपण त्यांच्यासोबत जाऊ शकत नसलो तरीही उपवास करुन आपण त्यांच्या मागण्या मान्य होतील यासाठी प्रार्थना करु असंही केजरीवाल यांनीही म्हटलं आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News