संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
नुकतीच कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाची तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून यात माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी पंचायत समिती उपसभापती नवनाथ आगवन यांची तालुका कोषाध्यक्ष पदी तर सौ पूनम सुनील देसाई यांची तालुका उपाध्यक्षपदी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे व औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष सुधाकर रोहाम यांनी निवड करत सौ कोल्हे यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले.
त्यांचा या निवडीबद्दल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना संचालक भास्कर भिंगारे व त्यांचा धर्मपत्नी झुंबरबाई भिंगारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या वेळी संपूर्ण भिंगारे परिवार व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.