कोपरगावातील विस्थापित टपरीधारकांना न्याय मिळवुन देण्यासाठी व्यापारी संघर्ष समिती चे जिल्हाधिकारी यांना निवेदन !!


कोपरगावातील विस्थापित टपरीधारकांना न्याय मिळवुन देण्यासाठी व्यापारी संघर्ष समिती चे जिल्हाधिकारी यांना निवेदन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव शहरातील विस्थापित झालेल्या टपरीधारकाना खोका शॉप बांधून देण्या संदर्भात कोपरगांव नगपरिषदेस सूचना करनेबाबत आज मा. जिल्हाधिकारी साहेब यांना कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मागील दहा वर्षापुर्वी कोपरगाव  नगर परीषदेने शहरातील अतिक्रमणे काढली होती यामध्ये टपरीधारकांचा समावेश होता. त्यावेळी विस्थापित टपरीधारकांचे पुर्नवसन करण्याची आश्वासने देण्यात आली होती.परंतु आजतागायत ती पूर्ण झाली झाली नाही.

कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने वेळोवेळी या मागणीचा पाठपुरावा करताना ज्या ठिकाणी काही अडथळा नाही अशा ठिकाणी विस्थापित टपरीधारकांना खोका शॉप बांधुन देण्याची विनंती केली होती. परंतु प्रशासनाबरोर बैठकी होउन त्यावर अद्याप सकारात्मक तोडगा निघाला नाही तरी आपण या प्रकरणी लक्ष घालुन विस्थापिताना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावें अशी विनंती कोपरगांव व्यापारी संघर्ष समिति च्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यां नी या विषयावर सविस्तर चर्चा केली. या निवेदनावर अकबर भाई शेख शरद त्रिभुवन ,अंकुश वाघ, निसारभाई शेख, बालाजी गोर्डे, सागर कानडे, इम्रान मनियार, यांच्या सह्या आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News