प्रसन्न नागरी पतसंस्थेची खाते निहाय चौकशी लावण्याची मागणी


प्रसन्न नागरी पतसंस्थेची खाते निहाय चौकशी लावण्याची मागणी

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

प्रसन्न नागरी सहकारी पतसंस्था बारामती (सराफपोटे का़म्प्लेक्स, स्टेशन रोड ,बारामती) येथून अवैध कर्जवाटप प्रकरणे दिली गेली असुन सदर पतसंस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आहे. सोनेतारण प्रकरण झाल्यानंतर परत पतसंस्थेतून तेच सोने दुसऱ्या बँकेत तारण टाकले जाते याचे समक्ष पुरावे आमच्याकडे आहेत या गैरव्यवहारांमुळे व पैशाच्या भोंगळ कारभारामुळे सावकारकीला चालना मिळत असुन भरपाईपोटी लोकांची घर , जमिनी गेल्या आहेत  या पतसंस्थेवर चौकशी बसवून लवकरात लवकर कारवाई व्हावी व संचालक मंडळ, सचिव यांच्या खाजगी संपत्ती ची ही चौकशी व्हावी यासाठी बारामती प्रांत कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन दिनांक 11/ 12 /2020 पासून सुरू आहे अशी माहिती सिताराम वसंत गोसावी दिली तसेच मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे पदाधिकारी  असलम शेख व सत्त्याचा प्रहार संघाचे अमिन शेख यांनी भेट दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News