राहुरी जि.अहमदनगर येथे मा.राज्यमंत्र्यांचे घरावर वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा!


राहुरी जि.अहमदनगर येथे मा.राज्यमंत्र्यांचे घरावर वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा!

शिर्डी, राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

       वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय  बाळासाहेब आंबेडकर यांच्या मा जिल्हाअध्यक्ष विशाल भाऊ कोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली  वाढीव,वीज बील माफ करावे,वन जमिनी आणि गायरान जमिनीवरील आदिवाशी बांधवांचे अतिक्रमण नियमित करावे,जातीच्या दाखल्यासाठी असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात,ग्रामिण रुग्णालय इमारतीचा प्रश्न निकाली लावावा,घरकुलांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे  वतीने राहुरी येथील राज्यमंत्री श्री.प्राजक्त दादा तनपुरे यांचे निवासस्थानावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते..राहुरी बस स्थानकावरुन मोर्च्याची सुरुवात झाली...मोर्चाचे प्रमुख संयोजक माजी राहुरी तालुकाध्यक्ष श्री.अनिल जाधव यांनी सुरूवातीस मोर्चाचे कारण व मागण्या यांचे सविस्तर प्रास्ताविक केले. आणि मोर्चाचे मा.मंत्री महोदयांचे घराकडे प्रस्थान झाले..ग्रामिण रुग्णालयाचे समोर पोलीसांनी मोर्चा अडवला.मोर्चास पुढे जावू देण्यावरून मोर्चेकरी आणि पोलीस यांचे मध्ये बाचा बाची झाली व अखेर पोलीसांनी मोर्चाचे नेतृत्व करणारे अनिल जाधव,डॉ.घिगे,पिंटू नाना साळवे,आर.पी.आय तालुकाध्यक्ष विलास साळवे,बाबुराव मकासरे ,विजू अंकल गायकवाड, वगैरे कार्यकर्त्यांना बळाचा वापर करुन अटक केली.

           यानंतर मोर्चाचे नेतृत्व  जिल्हाध्यक्ष श्री.विशाल भैया कोळगे,महासचिव डॉ.सुधीर क्षीरसागर,मा.जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती वर्षाताई बाचकर जिल्हा सचिव श्री.सुनिल ब्राम्हणे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री.सुमित मकासरे,सल्लागार श्री.मधुकर साळवे यांनी केले..मोर्चा मा.मंत्री महोदय यांचे निवासस्थानी नेण्यास प्रशासनाने तिव्र विरोध केल्यामुळे तहसीलदार कार्यालयाकडे नेण्यात आला.तहसील कार्यालय परिसरात मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत करण्यात आले..यात सर्व सामान्यांचे प्रश्न व होणारी अडवणूक,आदिवासी ,दलित,कष्टकरी,शेतकरी यांच्या समस्या व प्रशासनाचे वेळ काढू धोरण आणि मा.राज्यमंत्र्यांची मोर्चेकरांच्या मागण्यांबाबत उदासिनता यावर जिल्हाध्यक्ष श्री.विशालभैया कोळगे,महासचिव डॉ.सुधीर क्षीरसागर,,मा.जिल्हाध्यक्ष डॉ.घिगे,उपाध्यक्षा श्रीमती वर्षाताई बाचकर,श्री.विलास नाना साळवे आणि मोर्चाचे मुख्य संयोजक माजी तालुकाध्यक्ष श्री अनिल जाधव यांनी पोटतिडकीने विवेचन केले. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या विविध मागण्यांचे निवेदन ना.प्राजक्त तनपुरे यांचे वतीने निवासी तहशीलदार श्री.तळेकर साहेब यांनी स्वीकारले.

यानतंर मा.तहशीलदार यांचे दालनात उपजिल्हाधिकारी श्री अनिल पवार यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाशी प्रत्येक मागणीवर सविस्तर आणि सहानुभुतीपुर्वक चर्चा केली.संबधित खात्यांच्या अधिका-यांना त्वरीत कार्यवाही करण्यासंबधी सुचना दिल्या.या चर्चेत निवासी तहशीलदार श्री.तळेकर साहेब आणि नगरपालिका,एम.एस.ई.बी,पंचायत समिती व 

     वंचित बहुजन आघाडीच्या नुतन अहमदनगर जिल्हा कार्यकारीणीच्या काळातील हे पहीलेच यशस्वी  "मंत्र्याच्या घरावर धडक मोर्चा" आंदोलन महाराष्ट्रभर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News