मंगळवार दिनांक १५ डिसेंबर २०२० रोजी वीज कंत्राटी कामगारांचे मुंबई आझाद मैदानावर आंदोलन


मंगळवार दिनांक १५ डिसेंबर २०२० रोजी वीज कंत्राटी कामगारांचे मुंबई आझाद मैदानावर आंदोलन

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

महावितरण महापारेषण व महानिर्मिती या वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या वतीने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने  मागील ५ - ६ महिन्या पासून अनेकदा मा. मुख्यमंत्री, उर्जामंत्री,  यांच्याकडे पत्र पाठूवन आंदोलने, पाठपुरावा केला या असंख्य पत्रव्यवहारा नंतर देखील कामगारांच्या या ज्वलंत समस्यांकडे मा. मुख्यमंत्री व मा. उर्जामंत्री यांनी आजवर सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना सध्या वीज उद्योगातील कामगारांची झाली आहे त्यामुळे आझाद मैदानावर लक्षवेधी आंदोलन करून नाय मागणार असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाचेअध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितलं आहे.

कोरोना सारख्या महामारी काळात स्वतःचा जीव धोक्यात घालत,ऊन, वादळ,वारा, पावसात आपल्या जीवाची तमा न बाळगता राज्यातील जनतेला अखंडित व सुरळीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत करणाऱ्या कामगारांना न्याय मिळावा, भरती मध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकशा नुसार वयोमर्यादेत वाढ करावी, विद्युत सहाय्यक ही भरती एस एस सी च्या मार्क मेरिट नुसार न लावता आय टी आय वीजतंत्री व तारतंत्रीच्या मेरिट नुसार करावी. कोरोना काळात शहीद झालेल्या २६ कामगारांना आर्थिक मदत करावी, कामगार कपातीचे धोरण रद्द करून आज रोजी कार्यरत अनुभवी एकाही कंत्राटी कामगाराचा रोजगार जाणार नाही याची ना.ऊर्जामंत्री व प्रशासनाने लिखित खात्री द्यावी.

या व अन्य प्रलंबित प्रमुख मागण्या साठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मुंबई येथे १५ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन होणार आहे. तरी या हक्काच्या लढाईसाठी राज्यातील वीज कंत्राटी कामगारांनी सामील होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष नीलेश व सरचिटणीस सचिन मेंगाळे  केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News