गावच्या माजी सरपंच हेमाताई माडगे यांना प्रतिभावंत महिला पुरस्कार .


गावच्या माजी सरपंच हेमाताई माडगे यांना  प्रतिभावंत महिला  पुरस्कार .

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

भिगवण गावच्या माजी सरपंच हेमाताई माडगे यांना  प्रतिभावंत महिला  पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते हा  पुरस्कार देण्यात आला 

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गाऱटकर, माजी सभापती प्रवीणभैय्या माने  तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा परिषद सद्स्य अभिजीत तांबिले , तालुका महिला अध्यक्ष छाया पडसळकर ,तालुका उपाध्यक्ष धनंजय थोरात, युवकचे तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेमाताइ माडगे ह्या भिगवण गावच्या माजी सरपंच असुन त्यांनी तत्कालीन कालावधीत भिगवण गावात स्वच्छता अभियान स्वता हातात झाडू घेऊन यशस्वीपणे राबविले. त्यांच्या कालावधीत भिगवण गावात अनेक विकासकामे मार्गी लागल्याने त्यांना जिल्हा परीषदेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देउन गौरवण्यात आले होते.

मा.खा. शरद पवारसाहेब  यांच्या वाढदिवसानिमित्त मला प्रतिभावंत महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने मन भरुन आले. मा.शरद पवार साहेबांनी महिलांच्या विषयक धोरणात्मक निर्णय घेउन महिला सक्षमीकरण करून महिलांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांची शतश ऋणी राहिल अशा भावना हेमाताई माडगे यांनी व्यक्त केल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News