राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ऑनलाईन रोजगार मेळावा


राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ऑनलाईन रोजगार मेळावा

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व औद्योगिक विकास मंत्री नवाब मलिक साहेब हे महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी ८० हजार रोजगारांची संधी उपलब्ध करून देणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम युवावर्गाला विनंती आहे.महाराष्ट्रातील तरुणांनी https://yodhaat80.org/ या  दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी. 

         कोरोनाच्या काळामध्ये बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे अनेक युवकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी संधी बेरोजगार आणि सुशिक्षित वर्गासाठी तयार केली गेलेली आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News