शिरूर न्हावरा येथे पानटपरीत 65 हजारांचा पान गुटखा जप्त,दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या पथकाची कारवाई


शिरूर न्हावरा येथे पानटपरीत 65 हजारांचा पान गुटखा जप्त,दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या पथकाची कारवाई

विठ्ठल होले  विशेष प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्यात पान गुटखा बंदी कायदा असताना छुप्या पद्धतीने आणि चढ्या दराने विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील एका छोट्याशा पान टपरी मध्ये 65867 रुपयांचा पान गुटखा जप्त करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना गोपनीय बतमीदारामार्फत खबर मिळाली की न्हावरा येथे पान टपरीवर गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून विक्री होत असते, त्यानुसार पोलीस नाईक दिपक वाईकर,पोलीस नाईक होले,पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गाढवे यांना सदरील माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले, त्यानुसार दोन पंचांना घेऊन न्हावरा गावातील मेन चौकात निळ्या रंगाच्या पान टपरी मध्ये छापा टाकला असता केसरयुक्त विमल पान मसाला त्याचे 109 पुडे,एका पुड्याची किंमत 187 रुपये,त्याची  किंमत 23383रुपये इतकी आहे,व्ही 1 तंबाखू 109 पुडे एकाची किंमत 33 रुपये,3597 रुपये असा एकूण 23980 रु,हिरा पान मसाला 80 पुडे 14080 रुपये,रॉयल 717 तंबाखू 80 पुडे 3520 रुपये असा एकूण 17600 रुपये,विमल मोठा पुडा 2420 रुपये,मोहक सिल्व्हर पान मसाला 7920 रुपये,गोवा पान मसाला 10527 रुपये,राजनिवास सुघंधीत पान मसाला 2100 रुपये असा एकूण 65867 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सागर परशुराम वाडेकर वय 32 राहणार न्हावरा तालुका शिरूर याला अन्न सुरक्षा व मानदे कायदा सन 2006 व त्या अंतर्गत नियम नियमाने 2011 चे कलम 26 (2)(IV),27 सहवाचनकलम 30 (2)(A)59 भा द वि कलम 188,273,34 नुसार सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद पोलीस नाईक दिपक वाईकर पोलीस ठाण्यात दिली असून वाडेकर यास अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News